धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदू राजेनिंबाळकर हे धाराशिव कळंब विधानसभा निवडणुक लढविणार असुन त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी पक्षाकडे धाराशिवची मागणी केली होती मात्र दोन्ही पैकी एकही ठिकाणी संधी दिली नाही त्यामुळे निवडणूक लढणार आहे.
धाराशिव कळंब मतदार संघाच्या विकासासाठी ही निवडणुक लढणार असल्याचे नंदू राजे निंबाळकर यांनी सांगितले. त्यांचा हा निर्णय खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना धक्का देणारा आहे. मकरंद राजे हे धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असुन राजकारणात ते जाईंट किलर म्हणुन ओळखले जातात, शहरासह ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांची मनधरणी करण्यात खासदार आमदार व शिवसेनेला यश येथे का हे पाहावे लागेल.
आमदार कैलास पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत मकरंद राजे निंबाळकर व त्यांच समर्थक सहभागी झाले नाहीत त्यांनी वेगळी भुमिका घेतली आहे.