महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील यांचा भाषणातुन गंभीर आरोप
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या कुस्ती स्पर्धा कश्या होणार नाहीत यासाठी प्रयत्न केले, हे मला माहित आहे मात्र मी खंबीर असल्याचे आयोजक सुधीर पाटील यांनी सांगत गंभीर आरोप केले. सर्व पक्षाचे प्रतिनिधी आले मात्र आमदार, खासदार लोकप्रतिनिधी आले नाहीत याचं दुःख असल्याचेही पाटील म्हणाले.
पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यावर दबाव आणला गेला त्यामुळे ते आले माहित मंत्री त्यांनी कुस्ती स्पर्धेसाठी अनमोल मदत केली असे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी सारख्या मोठ्या स्पर्धा धाराशिव शहरात आयोजित केल्या आहेत मात्र चौगुले सोडता कोणी आले नाही. मी काय प्रयत्न केले मला माहित आहे, मला काय त्रास झाला हे सांगावे लागेल. काही हरकत नाही मी फार खंबीर आहे. मी कोणताही कार्यक्रम घेतला तर मला संघर्षातून यावे लागत आहे पण मी कार्यक्रम यशस्वी करुन दाखवतो असे सुधीर पाटील म्हणाले.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ. व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजन केले होते. सुधीर पाटील, अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी यात मोलाची भुमिका बजावली.
धाराशिव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेला ज्यांना निमंत्रण दिले त्यातील आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार कैलास पाटील वगळता एकही मान्यवर उपस्थितीत राहिला नाही त्यामुळे कुस्ती प्रेमित नाराजीचा सुर आहे. त्यातच सुधीर पाटील यांनी जाहीर भाषणात आरोप केल्याने आगामी काळात त्यांच्या राजकारणाची दिशा बदलेल असे बोलले जात आहे,याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.