धाराशिव – समय सारथी
शिवराज राक्षे हा 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे ( गादी गट ) या दोघात अंतीम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्याने जखमी झाला, नंतर तो त्याच जोशाने मैदानात उतरला.
शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा मानकरी ठरला, ते पुण्यातील असुन नांदेड कडुन प्रतिनिधित्व करतात. मॅटवरील कुस्तीत या 6-0 गुणांनी शिवराज राक्षे या पैलवानाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत विजय मिळवला.
धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली.आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. रुस्तुम-ए – हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यावर स्पर्धा रंगल्या.
माती गटातून गणेश जगताप 2 गुण व हर्षवर्धन सदगीर 6 गुण अशी लढत होऊन हर्षवर्धन विजयी झाला तर गादी गटात कुस्ती शिवराज राक्षे 10 गुण व पृथ्वीराज मोहोळ 0 अशी एकतर्फी झाली त्यात राक्षे विजयी झाला.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ. व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजन केले होते. सुधीर पाटील, अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी यात मोलाची भुमिका बजावली.
ऑलिंपिक कास्यपदक विजेता योगेश्वर दत्त,महाराष्ट्र केसरी राहुल आवारे,अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार,माजी खासदार रविंद्र गायकवाड,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर,डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील,दीपक जवळगे,चंद्रकांत मोहोळ,संग्राम मोहोळ ,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरज सांळुके ,मोहन पनुरे,संजय दुधगावकर,महेंद्र धुरगुडे,संजय निंबाळकर,धनजंय शिंगाडे,विकास कुलकर्णी,जयसिंह देशमुख, सुधाकर मुंडे,महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष विजय बराटे , विभागीय सचिव वामनराव गाते,भरत मेकाले,स्पर्धेचे व्यवस्थापक सुंदर भाऊ जवळगे,गोविंद पवार,धनराज भुजबळ,शरद पवार,गोविंद घारगे,संतोषराव नलावडे,शिवाजी धुमाळ आणि असंख्य कुस्ती शौकीनांनी मैदानावर प्रचंड गर्दी केली होती.