तुळजापूर – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, धाराशिव, दिवाणी न्यायाधीशे वरीष्ठ स्तर धाराशिव, औद्योगिक कामगार न्यायालय, सहायक धर्मादाय आयुक्त धाराशिव, सह धर्मादाय वक्त लातूर, विविध महसुल न्यायालये ( तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इत्यादी कार्यालयातील महसूल प्रकरणे) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथा न्यायदंडाधिकारी, तुळजापूर येथील न्यायालयातील प्रकरणामध्ये मंदिर संस्था वतीने बाजु मांडणेकरीता विधी पॅनल तयार करणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.
विविध न्यायालयातील विधीज्ञ यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पॅनल विधीज्ञांकरीता पात्रतेचे निकष, अनुभव, प्रकरण निहाय मान फीस, निवड प्रक्रिया, अटी व शर्ती इत्यादी बाबतची सविस्तर माहिती संस्थानच्या https://www.shrituljabhavanitempletrust.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज विहीत कागदपत्र सह [email protected] या ईमेलवर व तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर प्रशासकीय कार्यालय येथे 5 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.