पुणे – समय सारथी
आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन व कार्यसिद्धी प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सांगता झाली. यामध्ये 300 पेक्षा अधिक नागरिकांची प्राथमिक तपासणी व 108 नागरिकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील नागरिक शस्त्रक्रियेनंतर भेटायला आले असता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. यापुढे देखील कार्यसिद्धी प्रतिष्ठान सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि न्यायासाठी कार्य करेल असा विश्वास यावेळी बोलताना गिरीराज सावंत यांनी दिला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, लाभार्थी उपस्थित होते.