अंतरवली – समय सारथी
राजकारण हा माझा पिंड नाही मात्र समाजाच्या आग्रहास्तव निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत आहे असे सांगत मनोज जरांगे यांनी राज्यात 15-20 जागेवर निवडणुक लढवीण्याची घोषणा केली. माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. 25 मतदार संघावर चर्चा झाली त्यात धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी व उस्मानाबाद कळंब या 2 मतदार संघात उमेदवार उभे करण्यात येणार आहे, येथील उमेदवार यांची घोषणा करण्यात येणार आहे. इतर ठिकाणी उमेदवार देण्यात येणार नसुन जिथे उमेदवार नसेल तिथे मराठा आरक्षण विरोधी भुमिका घेणाऱ्यांना पाडण्याचा निर्णय झाला आहे, रात्री उशीरा किंवा सकाळी 7 पर्यंत उमेदवार यादी जाहिर करण्यात येणार आहे.
माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांना संपवविल्या शिवाय राहणार नाही. समाजाला हीन वागणूक दिली, कोणता नेता पक्ष माहिती नाही समाजाला खचू देऊ नका, एकदा समाजाचे लेकर बना, लोकात हसू होऊ देऊ नका असे आवाहन जरांगे यांनी केले. बीड, केज, परतूर फुलंब्री, हिंगोली, मंठा,वसमत, हदगांव, दौंड, औरंगाबाद पश्चिम,करमाळा, कोपरगाव,कन्नड, पुणे जिल्ह्यातील दौंड, पर्वती, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा असे 15-20 जागा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले. ज्या ठिकाणी मतदार संघ नाव जाहिर झाले नाहीत त्या ठिकाणी सर्व मराठा उमेदवार यांनी अर्ज मागे घ्यावे असे आवाहन केले. दलित, मुस्लिम, ओबीसी यांचे प्रश्न मांडणारे उमेदवार देण्यात येणार असुन त्यांना विधानसभेत पाठवायचे आहे असे ते म्हणाले.