धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना बदलावे असे पत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा होती या चर्चेवर व वादावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पडदा टाकला आहे. पालकमंत्री बदला असे पत्र दिले नाही असा खुलासा आमदार पाटील यांनी केला आहे, विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री सरनाईक हे देखील उपस्थितीत होते. पालकमंत्री व आमदार पाटील हे हरीत धाराशिव उपक्रमास उपस्थितीत होते, दोघे एकत्र असताना पत्रकार यांनी हा प्रश्न विचारला.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात उघड वाद सुरु आहे. आमदार पाटील यांनी आक्षेप घेतल्याने निधी रखडला, त्याबाबत पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देत मनमोकळे केले होते, त्यानंतर सुद्धा निधीचा वाद मिटला नाही.
मी इथेच आहे, पत्र दिल्याचे सपशेल खोटे आहे, काम व्यवस्थित सुरु आहे, आपणं सगळे सहकार्य करा असे म्हणतं पत्र दिले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार पाटील यांनी दिले. आमच्यात मतभेद नसुन आम्ही दोघेही महायुतीचे घटक आहोत, महायुती सरकारचा पालकमंत्री या नात्याने मी इथे आलो आहे. आमदार पाटील हे महायुतीचे घटक आहेत, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, त्यासाठी प्राधान्य राहील असे पालकमंत्री म्हणाले. स्पष्टीकरण दिले असले तरी सुप्त संघर्ष सुरु असुन आमदार पाटील कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.