धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण लढ्याचा मोठा विजय झाला असुन सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. सगळीकडे दिवाळी आनंद उत्सव जल्लोष साजरा केला जात आहे.
मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात सगेसोयरे हा शब्द समाविष्ट करण्यात आला असुन त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. सरकारने राजपत्र प्रसिद्धी केले असले तरी याची अंमलबजावणी / मसुदा 16 फेब्रुवारी पासुन लागु असणार आहे. त्यामुळे सगेसोयरे लाभ मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
हे आहे राजपत्र, जे की सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गसाठी सुद्धा लागु असणार आहे.
मराठा आरक्षण राजपत्र pdf मराठी व इंग्लिश आदेश