धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात एका गॅस वितरकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन गॅस वितरणाच्या तणावात त्याने प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. एचपी गॅस कंपनीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग बैठकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील डीलर ज्ञानेश्वर माळी याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन ते गंभीर असल्याने सोलापूरला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. कंपनीने तपासणी केली असता स्टॉक आणि वितरण याच्यात तफावत आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून त्याच्याकडे कंपनीची येणे वसुली असल्याने पुरवठाही बंद होता. तामलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरू आहे. जवळपाद 1 हजार 200 गॅस सिलेंडरची तफावत असुन 7 लाख रक्कम आहे. हा साठा कोणाला विकला हे समोर आले नाही.












