कधी शाळेत, शेतातील बांधावर तर कधी गावातील पारावर – लेखाजोखा मांडत विकासाची संकल्पना
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी गाव संवाद दौरा सुरु केला असुन त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावसंवाद दौऱ्यात पालकमंत्री ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय मुले यांच्यासोबत संवाद साधत असुन त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहेत. कधी शाळेत, शेतातील बांधावर तर गावातील पारावर जाऊन मंत्री सावंत हे संवाद साधत आहेत.
डॉ तानाजीराव सावंत हे मंत्री झाल्यापासुन धाराशिव जिल्ह्यात आरोग्य, सिंचन क्रांती झाली असुन करोडो रुपयांचा विकास निधी आला आहे, आजवर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आगामी काळात करायच्या विकासाची संकल्पना ते लोकांना सांगत आहेत. परंडा, वाशी व भुम मतदार संघात त्यांनी जनता दरबार घेऊन अनेक समस्या सोडविल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल ग्रामीण भागात महिला त्यांचे औक्षण करीत स्वागत करीत आभार मानत आहेत.
परंडा तालूक्यातील चिंचपुर, शेळगाव, धोत्री, सक्करवाडी, पांढरेवाडी, लंगोटवाडी, चिंचपूर, ताकमोडवाडी, जेकटेवाडी, देवगाव खुर्द, गोसावीवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या 12 गावांत त्यांनी नुकताच संवाद दौरा केला. यावेळी चिंचपूर येथील मंदीरासमोर सभा मंडप बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली. तसेच विविध विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्वखर्चाने विकास कामे करून देणार असल्याची घोषणा यावेळी केली.
जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, मा.जि.उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत, जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके , जेष्ठ नेते अॅड. सुभाष मोरे, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, चिंचपुर ग्रामपंचायतीचे सरंपच डॉ. महेश देवकर, पंचायत समीतीचे माजी देवकर, आनिल सरपंच महादेव देवकर, प्रदिप पाटील, दत्ता कुलकर्णी, गणेश सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.