धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक आरोपी विनोद गंगणे यांचे सोलापूर येथील ड्रग्ज तस्कर पिटा सुर्वे याच्या सोबत आर्थिक व्यवहार सापडले आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या रिमांड वेळी सोलापूर येथील आरोपी पिटा सुर्वे याला पाहिजे असलेला फरार आरोपी दाखवले असुन त्याच्या सोबत विनोद गंगणे यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. पोलिसांना त्याबाबतचे पुरावे मिळाल्याचे त्यांनी नमुद केले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने तपासाला मर्यादा येत आहेत, न्यायालयाने सुद्धा राजकीय दबाव आहे का? असा मुद्दा उपस्थितीत केला आहे.
सुर्वे सोबतच गंगणे यांचे मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे, संतोष खोत, युवराज दळवी,विश्वनाथ मुळे, गजानन हंगरगेकर,बापु कणे, प्रसाद घोटण कदम,आबासाहेब पवार,विनायक इंगळे,संदीप टोले,विशाल सोंजी असा तब्बल 12 जणापेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. गंगणे यांनी 12 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले असुन त्याचे काय केले याचा पोलिसांना संशय आहे.
फरार कालावधीत गंगणे यांनी इतर फरार आरोपींशी सपर्क केला काय? गंगणे हे यातील अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांचे मित्र असुन त्यांचा ठावठिकाणा सदर अटक आरोपी यांना माहीती असुन त्याबाबत ते उडवाउडवीची उत्तरे देत आहे. गुन्हयामध्ये कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नसुन व कोणतेही माहिती देत नाही. आरोपीकडे चौकशी करून फरार आरोपी यांचा शोध घेउन अटक करणे बाकी आहे. तुळजापुर शहरामध्ये व इतर ठिकाणी अमली पदार्थ खरेदी विकिचे मोठे रॅकेट असुन त्यामध्ये इतरही आरोपी सकिय आहेत, गंगणे यांचेकडे चौकशी करणे असल्याचे पोलिसांनी कोर्टात रिमांड वेळी म्हण्टले आहे.