धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक आरोपी विनोद गंगणे यांना कोर्टाने 12 जुनपर्यंत वाढीव पोलीस कोठडी दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी झाली यावेळी कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा झापले. पोलिसांच्या कोर्टातील भुमिकेवर न्यायाधिशानी नाराजी व्यक्त करीत प्रश्नचिन्ह निर्माण केले. आरोपी विनोद गंगणे याला 6 जुन रोजी अटक केल्यानंतर 9 जुन सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती, ती संपल्यावर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.
पोलिसांनी 3 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मागीतली त्यावर कोर्टाने 3 दिवसांची कोठडी दिली. कोर्टात रिमांड दाखल करताना पोलिसांनी गंगणे यांच्यावर केवळ सेवनाचा कलम 27 अन्वये आरोप ठेवला, मागील वेळी सुनावणीत गंगणेचा कटात सहभाग असल्याचे कोर्टात सांगितले मात्र ते 29 कलम आज रिमांडमध्ये दिले नाही त्यावरून कोर्टाने पोलिसांना चांगलेच झापले. तुमचं चाललंय तरी काय? असे विचारले जात आहे. इतर आरोपीना पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली मात्र गंगणे बाबतीत वेगळी भुमिका घेतली जातेय, पोलीस 2 वेळेस कोर्टात तोंडावर पडले आहेत.
तुम्हाला आरोपीला वाचवायचे आहे का तसे असेल तर सांगा? असा प्रश्न विचारला. तपास अधिकारी गोकुळ ठाकुर हे कोर्टात हजर न होता इतर अधिकाऱ्याला पाठवले. त्यावेळी त्यांनी मला यातील काही माहिती नसल्याचे सांगितले. कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थितीत केले असुन यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्ह्यात नाव आल्यावर गंगणे यांचे 2 मोबाईल गहाळ झाले असुन मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद केला आहे, ते मोबाईल जप्त झालेले नाहीत.
मागील सुनावणी दरम्यान कोर्टाने तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांना काही प्रश्न विचारले त्यावर सपोनि ठाकुर हे निरुत्तरीत झाले. दोषारोप पत्र दाखल करताना तस्कर व सेवन असे 2 गट केले ते कोणत्या आधारावर, गंगणे याच्या विरोधात दोषारोप पत्र वेळी पुरावे होते तर मग त्यांना त्याचं वेळी तस्कर गटात का सहभागी केले नाही ? त्यांना त्यावेळी फेव्हर (मदत करायची) द्यायचं व सगळं कोर्टावर सोडून द्यायचं. राजकीय कारण किंवा राजकीय दबाव होता का ? गंगणे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत हे कारण होते का ? यांचे उत्तर फक्त तपास अधिकारीच देऊ शकतात असा सवाल केला कोर्टाने केला त्यावर तपास अधिकारी गप्प राहिले.