गुन्हेगारी मानसिकता, पुरावे नष्ट करण्याचा कट – कोर्टात दावा
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज व्यसनमुक्त झाल्यानंतर विनोद गंगणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व त्यांनी विश्वासात घेतल्याने पोलिसांना ‘टीप’ दिली. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि तथा तक्रारदार सुदर्शन कासार यांनी 15 फेब्रुवारी रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात पुरवणी जबाब दिला, त्यात त्यांनी गंगणे हे खबरी असल्याचे सांगितले. तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आदेशीत केले की ड्रग्जबाबत गंगणे हे माहिती देतील त्यानुसार कारवाई करा, त्यानुसार कारवाई होत ड्रग्ज रॅकेट होत आरोपी पकडले.
गंगणे यांना व्यसन लागले त्यामुळे विविध सामाजिक, आर्थिक व कौंटुंबिक अडचणीनींना सामोरे जावे लागले. व्यसन कसे लागले व बाहेर पडले, हे पोलिसांना सांगितले. तरूणांना या व्यसनाचे बळी पडण्यापासून रोखण्यासाठी ते एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाचे विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याकरीता पोलीसांना मदत करणार असल्याचे सांगितले.
2 वेळेस त्यांनी नंबरसह टीप दिली. मात्र 1 वेळेस अपयश आले. 2 फेब्रुवारीला 8691810500 व 9082974789 हे नंबर दिले मात्र कारवाईचा संशय आल्याने ते मोबाईल स्विच ऑफ करून पळून गेले त्यानंतर 14 फेब्रुवारीला सकाळी 8 च्या सुमारास पिटू गंगणे यांनी 9850110411 वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तुळजापूर येथील अंमली पदार्थाचे विक्री करणारे येणार असल्याचे सांगितले व 6 मोबाईल नंबर दिले. 7559484145,8805921169,9679797879,9604616665,9922681582,8928335555 हे नंबर व्हाट्सऍपवर पाठवले तसेच वेळोवेळी संपर्क करून एमडी ड्रग्ज बाबत अधिक माहिती दिली.
गुन्हेगारी मानसिकता, पुरावे नष्ट करण्याचा कट
गंगणे यांना पोलिसांनी ड्रग्ज गुन्ह्यात आरोपी केले असुन सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. गंगणे हे पोलिसांचे खबरी आहेत तर मग त्यांनी त्यांचे 2 मोबाईल पोलिसांना का दिले नाहीत, गहाळ गुन्हा नोंद केला असा प्रश्न कोर्टाने केला आहे. गंगणे यांचे नाव 25 मार्चला निष्पन्न झाल्यावर 28 मार्चला मोबाईल गहाळ झाल्याचा गुन्हा नोंद केला. त्या मोबाईलमध्ये ड्रग्जसह अन्य अनेक पुरावे असल्याचा पोलिसांना संशय आहे. यात गंगणे यांची गुन्हेगारी मानसिकता क्रिमिनल माईंड व पुरावे नष्ट करण्याचे दिसुन येथे असे जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख म्हणाले. 2 मोबाईल शोधणे पोलिसांसमोर आव्हान असुन तो मुद्दा कोर्टात महत्वाचा ठरला आहे.