धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत आरोपी विनोद गंगणे यांच्या जामीन अर्जाच्या वेळी त्यांचे वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टात बाजु मांडली, ऍड अंगद पवार यांनी सहकार्य केले. आरोपी वकील यांनी सांगितले की, आरोपीचा सहभाग हा सेवन पुरता मर्यादित आहे. आरोपीने पोलिसांना स्वतः पुढे येऊन माहिती दिली. तो पोलिसांचा खबरी होता त्याने कोणाला ड्रग्ज विकले नाही. या गुन्ह्यात 37 आरोपी आहेत, पोलिसांनी तो खबरी असल्याचे नाव उघड केल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांनी कोर्टात म्हणणे सादर करताना जे मुद्दे दिले आहेत त्यात आर्थिक व्यवहार, सीडीआर आहेत. पोलिसांनी तपास केला, साक्षीदार व आरोपी यांचे जबाब घेतले, पुरावे गोळा केले त्यानंतर दोषारोप पत्र दाखल केले, त्यामुळे आता तपास करण्यासारखे काही नाही. सेवन करण्यासाठी पाठवलेले पैसे, मी पैसे विकण्यासाठी माल घेतला असे पोलिसांच्या दोषारोप पत्रात कुठेही नमुद नाही. अगोदरच आरोपी अमली पदार्थच्या विळख्यात सापडला असल्याने त्याचे शारीरिक, आर्थिक,मानसिक व कौटुंबिक नुकसान झाले आहे. ड्रग्ज खरेदीसाठी पैसे दिले व सेवन केले, त्यानंतर व्यसन लागल्यावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले व स्वतःला व्यसनमुक्त करुन सोडवले. इतर लोकांना वाचवण्यासाठी आरोपीने हे ड्रग्ज रॅकेट उघड केले असे वकील म्हणाले.
गंगणे हे मुख्य सुत्रधार आहे असे दोषारोप पत्रात कुठेही नमुद नाही कदाचित पोलिसांनी कोर्टात जे म्हणणे दाखल केले आहे ते कॉपी पेस्ट असावे. काही तरी पुरावा असावा की त्यांनी विक्री केली. तात्पुरता दिलासा दिल्यावर गंगणे यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले. मुख्य सूत्रधार असे पोलिस सगळ्यांना लिहीत आहेत, ते चुकून लिहले असावे. ते सूत्रधार आहे याला बेस नाही. व्हिसल ब्लोअर बाबतीत असे झाले तर कोणीही पुढे येऊन ड्रग्ज रॅकेट उघड करणार नाही, तो केवळ स्वतः पुरते पाहिल.जामीन दिला तर अटी शर्ती पाळू, तपासात कलम वाढ झाले तर कधीही अटक करता येईल. 27 व 29 हे दोन्ही कलम एकत्र वाचावे असे दुशिंग म्हणाले.
तपास अधिकारी यांनी तपासात पोलिस अधीक्षक यांचा जबाब घेणे आवश्यक होते मात्र तो घेतला नाही. 3 वेळा ट्रॅप केला मात्र 2 वेळा फेल गेला, आरोपीना संशय आला त्यानंतर जास्तीचे पैसे पाठवले मग यश आले. 2019 ते 2024 काळात व्यसन लागले या काळात त्यांनी 12 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले. 60 महिने म्हणजे एका महिन्याला 20 हजार ड्रग्ज घेतलेअशी बाजु मांडली त्यावर सरकारी वकील म्हणाले की हे आकडे 2023 नंतरचे आहेत इतर आर्थिक व्यवहार असुन शकतात.
गंगणे हे तस्कर असल्याचा पुरावा काय आहे. गेली 6 दिवसात गंगणे यांनी पोलिसांसमोर हजेरी लावली त्यात त्यांनी काय तपास केला. चार्जशीट दाखल केल्यानंतर जो तपास झाला त्यात एक कागद आहे का जो स्पष्ट करेल की गंगणे हे पेडलर आहेत. घरच्यांनी पैसे देणे बंद केले म्हणुन त्यांनी भाचा मित्र यांच्याकडुन पैसे घ्यायचे कधी त्यांच्या फोन पे वरून पैसे पाठवायचे अशी बचावात्मक भुमिका 1 लाख 85 हजार रुपयांच्या व्यवहारावर घेतली.