धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 6 आरोपीनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, जिल्हा न्यायालयात 15 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले त्यापैकी 6 जन हे उच्च न्यायालयात गेले आहेत तर 6 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. ड्रग्ज तस्करीत 16 आरोपी फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 21 जुनला धाराशिव कोर्टात उदय शेटे व आबासाहेब पवार यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात मुंबई येथील तस्कर संगीता वैभव गोळे, इंद्रजीतसिंह मिटू ठाकुर, अभिजीत अमृतराव,अमित उर्फ चिम्या आरगडे,विशाल सोंजी व स्वराज उर्फ पिनू तेलंग या 6 आरोपीनी धाव घेतली असुन त्यांचे अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयात एकाही आरोपीला दिलासा मिळालेला नाही.
धाराशिव कोर्टात 6 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. त्यात 21 जुन रोजी तस्कर गटातील फरार आरोपी उदय शेटे, सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 24 जुनला सेवन गटातील माजी सभापती शरद जमदाडे व जेलमधील अटक आरोपींची नियमित सुनावणी होणार आहे. 25 जुनला सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम पाटील व 27 जुनला रणजित पाटील यांच्या अर्जावर सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मीटकरी यांच्या कोर्टात होणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 21 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (16) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 16 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत