धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीला खासदार, आमदार, निमंत्रित सदस्य यासह शासकीय अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. 408 कोटीपैकी 143 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 265 कोटी रुपयांचा निधी शिल्लक असुन त्याच्या कामाला व आगामी आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन या बैठकीत होणार आहे, त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे. सरनाईक हे जुन्या कामांना मान्यता देतात की नवीन कामे सुचवतात याकडे लक्ष लागले आहे. समसमान निधीवाटप, जुनी नवीन कामांची यादी यामुळे बैठक वादळी ठरणार आहे.