धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी बोगस बिले काढली असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने फड यांनी 7 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश नगर परिषद प्रशासन विभागाचे आयुक्त यांनी दिले आहेत.
मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगर परिषदेमध्ये लेखसंहिता 2013 प्रकरण कामे अंतर्गत नियम 138 प्रमाणे कार्यवाही करणे करीता कामाचा छाननी तक्ता तयार करुन करोडो रुपयांची बिले प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता चुकीच्या कामाची बिले अदा केली आहेत. त्या अनुषागने जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी याना पत्रव्यवहार करुन खुलासाही मागितला मात्र मुख्याधिकारी यांनी मुदत मागितली. मुदत संपुनही अद्याप पर्यत खुलासा प्राप्त झालेला नाही ही गंभीर बाब आहे.
मुख्याधिकारी यांनी काढलेल्या बोगस बिलाची उच्च स्तरीय समिती नेमून त्याची सखोल चौकशी करुन सर्व दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व ही चौकशी सुरू असेपर्यंत मुख्याधिकारी फड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी धस यांनी केली आहे.