अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने दिले 95 लाख तर ओमराजे यांना शिवसेनेने दिले 50 लाख
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील 31 उमेदवार यांनी अंतीम निवडणुक खर्च सादर केला असुन तो निवडणुक आयोगाने स्वीकारला आहे. शिवसेना उबाठा गटाचे ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणुन निवडुन आले. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीत 72 लाख 40 हजार रुपयांचा खर्च केला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी सर्वाधिक 88 लाख 12 हजार रुपयांचा खर्च केला. ओमराजे यांना शिवसेना पक्षाने निवडणुकीसाठी 50 लाख रुपये खर्चासाठी दिले तर अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने 95 लाख रुपये दिले. ओमराजे यांना मतदारांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे जमा करुन दिले, ते व इतर माध्यमातून ओमराजे यांना तब्बल 30 लाख 67 हजार रुपयांची रक्कम पक्षनिधी व्यतिरिक्त मिळाली.
31 उमेदवार यांनी 2 कोटी 14 लाख 34 हजार 334 रुपये खर्च केले. त्यात ओमराजे व अर्चना पाटील या दोघांनी 1 कोटी 60 लाख तर उर्वरित 29 उमेदवार यांनी 53 लाख 80 हजार खर्च केले.
अर्चना पाटील यांना पक्षाने 95 लाख दिले त्यातील त्यांनी 88 लाख 12 हजार खर्च केले म्हणजे त्यांचे 7 लाख शिल्लक राहिल्याने त्या तश्या आर्थिक फायद्यात राहिल्या तर ओमराजे यांना पक्षाने 50 लाख दिले त्यांनी 72 लाख 40 हजार खर्च केले म्हणजे पक्ष निधी व्यतिरिक्त ओमराजे यांनी 22 लाख खर्च केले. ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लाख 29 हजार 846 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.ओमराजे यांना 7 लाख 48 हजार 752 मते तर अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते पडली.
निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 31 उमेदवारांनी पुढील प्रमाणे खर्च केला. सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ( 88 लाख 12 हजार 666 रुपये) ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ( 72 लाख 40 हजार 868 रुपये) संजयकुमार भागवत वाघमारे,बहुजन समाज पार्टी ( 2 लाख 8 हजार 714) आर्यनराजे किसनराव शिंदे, राष्ट्रीय समाज दल (आर) (71 हजार 240),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर,वंचित बहुजन आघाडी (8 लाख 15 हजार 169),नेताजी नागनाथ गोरे,देश जनहित पार्टी (90 हजार), नवनाथ विश्वनाथ दुधाळ,विश्व शक्ती पार्टी (1 लाख 6 हजार),नितेश शिवाजी पवार,हिंदराष्ट्र संघ ( 1 लाख 6 हजार ),ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे, आदर्श संग्राम पार्टी (87 हजार),शामराव हरीभाऊ पवार, समनक जनता पार्टी (42 हजार 840),शेख नौशाद इकबाल,स्वराज्य शक्ती सेना (38 हजार 730), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (3 लाख),ज्ञानेश्वर नागनाथ कोळी,समता पार्टी (36 हजार), अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष ( 3 लाख 31 हजार रुपये) निवडणुकीत खर्च केले.
उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (33 हजार 700),काका फुलचंद कांबळे, अपक्ष(7 लाख),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (5 लाख 16 हजार),गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (57 हजार), नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (34 हजार), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (27 हजार), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (4 लाख 76 हजार),नितीन खंडू भोरे,अपक्ष (25 हजार) मनोहर आनंदराव पाटील,अपक्ष (25 हजार), योगीराज आनंता तांबे,अपक्ष (25 हजार), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (1 लाख 30 हजार),राम हनुमंत शेंडगे,अपक्ष (77 हजार),विलास भागवत घाडगे,अपक्ष (58 हजार),शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (2 लाख 16 हजार),समीरसिंह रमेशचंद्र साळवी,अपक्ष (46 हजार), सोमनाथ नानासाहेब कांबळे अपक्ष (6 लाख 56 हजार), हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (28 हजार रुपये) खर्च केले.