धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहर पोलीसांनी मोठी कारवाई करीत जुगार अड्ड्यावर छापा टाकत अंदाजे 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करीत 11 आरोपीना अटक केली आहे. त्यात काही बुक्कीमालकांनाही अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सन 2023 ते 2025 पर्यंतचे 20 रजिस्टर, 3 प्रिंटर, 11 मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल आहे.
धाराशिव शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयच्या पाठीमागे आयोध्या नगर येथे एका बंद खोलीमध्ये बुक्की चालू होती. धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी व त्यांच्या टीमने छापा टाकला.
इरफान इस्माईल शेख या मुख्य बुकीसह सोहेल बाबा शेख, अमरुत विश्वनाथ शेरखाने, रजत हजरत शेख, मेहफुज जिंदावली शेख, शेर मोहम्मद सलीम शेख, शाकीर हमीद शेख, माजिद हमीद शेख, आवन विनायक वाघमारे, रिजवान खय्याम शेख व एक अल्पवयीन अश्या 11 आरोपींचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर ठाणे कुमार दराडे यांच्या पथकाने छापा टाकला या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे रवींद्र, पोलीस उपनिरीक्षक अक्षय डिगोळे,पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस हवालदार बेळे व मिसाळ हे या पथकामध्ये सहभागी होते.












