परंडा – समय सारथी
परंडा तालुक्यातील शेळगाव येथील खैरी नदीवरील पुलाचे लोकार्पण राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले, यासोबतच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे तसेच जिल्हा सरहद चिंचपुर, शेळगाव, सोनारी, डोंजा ते राज्य मार्ग रस्त्याचे सुधारणा कामाचेही लोकार्पण करण्यात आले.
खैरी नदीवरील लहान पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीला अडचणी निर्माण होत होत्या, आणि या पुलाचे मोठ्या स्वरूपात बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. आजच्या कार्यक्रमात मंत्री सावंत यांच्या हस्ते शेळगावमध्ये विविध विकासकामांचेही उद्घाटन करण्यात आले.
ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा मोठ्या उत्साहात पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अॅड. सुभाष मोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय बापू मोहिते, गौतम लटके, जयदेव बप्पा गोफणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.