धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 3 ते 6 डिसेंबर अश्या 4 दिवसांच्या दौऱ्यावरयेणार असुन आयोग धाराशिव, लातूर, सोलापूर या 3 जिल्ह्यात मराठासह विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रीय पाहणी करणार आहे. विविध जातींच्या नोंदी अभिलेख तपासणार आहे तर विविध शासकीय विभागातील मंजुर पदे, आकृतीबंध यांची माहिती घेणार आहे. आयोगाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्ती न्यायमुर्ती आनंद निरमुडे यासह सदस्य पाहणी करणार आहेत.
3 डिसेंबर लातूर मुक्कामी, 4 डिसेंबर लातूर, 5 डिसेंबर धाराशिव, 6 डिसेंबर सोलापूर येथे घेणार बैठका व पाहणी करणार आहे. आढाव्या सोबत देवदर्शन भेट दौरा असुन यात तुळजाभवानी, विठ्ठल मंदीर भेट देणार आहे.