धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्यात एका बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरचा सुळसुळाट असुन ते रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याने कारवाईची मागणी होत आहे. डॉ. निरापद अनिल बानर्जी (बोली जि सवाई माधोपुर राजस्थान ह.मु. उमरगा चि. ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी मागील पाच महिन्यापासुन कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी/पदविका शिवाय व्यवसाय करुन जनतेच्या अरोग्यास व जीवीतास धोका निर्माण करुन कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र व मान्यताप्राप्त नसताना तसे भासवून पेशंट कडून पैसे घेवून त्यांची फसवणुक केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.म.र फीकोद्दीन म. कबीरोद्दीन अन्सारी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 319(2),318(4), सह इंडीयन मेडीकल कौन्सील ॲक्ट 1958 कलम 15 सह महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीसेस ॲक्ट1961 कलम 33(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.