धाराशिव – समय सारथी
मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण सभा विना परवानगी आयोजीत करणाऱ्या आयोजकावर गुन्हा नोंद करण्यात आला असुन एक प्रकारे सरकार ऍक्शन मोडवर आल्याचे बोलले जात आहे.
भुम तालुक्यातील ईट येथे जरांगे सभा झाली होती त्यात आयोजक संदीपान कोकाटे व प्रवीण आप्पासाहेब देशमुख या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेश लागु असताना सभा घेतल्याचा आरोप आहे. कलम 188 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.