धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा तात्पुरता जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी नाकारला आहे. छातीत दुखतं व इतर कारणाने त्यांना वैद्यकीय कारणाने उपचाराची गरज असल्याने तात्पुरता जामीन द्यावा असा अर्ज त्यांच्या वकिलांनी केला होता, गंगणे यांच्यावर सध्या धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे, तिथे चांगल्या दर्जाचे उपचार व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याचे जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी मांडले, यासह इतर मांडलेला युक्तिवाद ऐकून कोर्टाने तात्पुरता जामीन नाकारला आहे.
गंगणे यांना 6 जुन रोजी अटक केल्यानंतर 12 जुन रोजी कोर्टाने सुनावणी नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली, त्यानंतर त्यांच्या वकिलांनी वैद्यकीय आजाराचे व उपचाराचे कारण देत तात्पुरता जामिनीसाठी अर्ज केला होता त्यावर 13 जुनला सुनावणी झाली. गंगणे यांची तब्येत खराब असुन छातीत दुखतं आहे त्यामुळे उपचाराची गरज आहे असे सांगत तात्पुरता जामीन अर्ज केला. या अर्जाच्या अनुषंगाने कोर्टाने तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे म्हणणे मागितले होते.