धाराशिव – समय सारथी
पवनचक्की कंपन्या व त्यांच्या दलालाकडुन शेतकऱ्यांची होणारी फसववुन व पिळवणूक थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी पावले उचलायला सुरुवात केली असुन जिल्ह्यातील चारही उपविभागीय क्षेत्रात पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहायाबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश काढले आहेत. मध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश काढले आहेत. धाराशिव जिल्हयातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने ज्या शेतक-यांच्या अडचणी आहेत, त्या शेतक-यांनी हजर राहून तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन केले आहे. धाराशिव जिल्ह्यात काही पवनचक्की कंपनीकडुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व मारहाणीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर पोलिस व महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
महाराष्ट्र शासन, उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक पवन- 2010/प्र.क्रं. 422/ ऊर्जा 7 दि. 31 ऑक्टोंबर, 2013 च्या अनुषंगाने पवन ऊर्जा पकल्प उभारणीस चालना देण्यासाठी तसेच शासनाचे विविध विभाग, जमीन मालक शेतकरी व प्रकल्प विकास/प्रकल्पधारक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली ” पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती आण ि महसूल उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ” पवन ऊर्जा प्रकल्प – उपविभाग स्तरीय समन्वय समिती ” स्थापन करण्यात आलेली आहे.
पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनियमितता तपासणे. पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडित असलेल्या जमीन व्यवहारांमध्ये योग्य व व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे. पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे. जिल्हयातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उध्दवना-या अडचणींचे निराकरण करणार आहे.