आरोग्य विभागात 24 महिन्यात सावंतांनी घेतले विक्रमी 42 निर्णय, अमुलाग्र बदल
महाआरोग्य शिबीराचे जागतिक रेकॉर्ड – 15 लाख वारकऱ्यांची रुग्णसेवा व उपचार
परंडा / धाराशिव
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार करीत सन्मान केला. आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या संकल्पनेतुन यशस्वी झालेल्या महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असुन सर्वात मोठे आरोग्य शिबीर म्हणुन ‘इंटरनॅशनल रेकॉर्ड ऑफ एक्सलेंस’ हा किताब दिला. आरोग्यमंत्री सावंत यांनी आरोग्य विभागात घेतलेल्या निर्णय व महाआरोग्य शिबिराची जागतिक नोंद झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री यांच्या कामाचे कौतुक करीत सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात संपन्न झाला, यात सावंत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये डॉ सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षात नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा लेखाजोखा मांडला. गतवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांना पुरविलेल्या आरोग्य सुविधांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. आरोग्य विभागाने राबविलेल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि जागरूक पालक सुरक्षित बालक या अभियानांमुळे राज्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 12 कोटी 65 लाखापेक्षा अधिक नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून जवळपास साडेअकरा हजार युवक-युवतींना नोकरी दिली आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून याद्वारे अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांची कार्यवाही केल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
पंढरपूर येथे महाआरोग्य शिबीर घेण्यात आले यात 15 लाख 12 हजार 774 वारकरी यांची तपासणी करण्यात आली, यात 7 हजार 500 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याच्या अनेक अडचणी येतात, विविध घटनात 120 वारकऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. हार्ट अटॅकसह इतर गंभीर प्रकारात 1 हजार 270 रुग्णांवर तात्काळ उपचार केले गेले.मंत्री डॉ सावंत हे ‘देवदुत’ ठरले असुन त्यांच्या रूपाने पांडुरंग धावुन आले.आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या अभियानाचे 2 रे वर्ष आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून याची सुरुवात आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी केली.