धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला असुन मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 5 जणांच्या वारसांना 50 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले आहे, राज्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली आहे. मराठा आरक्षण व त्यांच्या मागणीनुसार दिलेल्या शब्दाला मुख्यमंत्री फडणवीस कटीबद्ध असुन त्यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना उपोषण आंदोलन दरम्यान मान्य केलेल्या मागण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरिता बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील 5 व्यक्तीच्या कायदेशीर वारसांस मुख्यमंत्री यांच्या “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मधून प्रत्येकी 10 लाख प्रमाणे 50 लाख अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील बालाजी मधुकर भोसले, कळंब तालुक्यातील हळदगाव येथील प्रतिक रणजीत सावंत, तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील योगेश संजय जाधव, उमरगा तालुक्यातील तलमोड येथील संजय देविदास मोरे व धाराशिव तालुक्यातील पाटोदा येथील शिवाजी विठ्ठल निलंगे या 5 जणांच्या वारसाना प्रत्येकी 50 लाख मदत देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.