धाराशिव – समय सारथी
महसूल पंधरवडा निमित्त तहसील कार्यालय धाराशिव येथे सांघिक कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तहसीलदार मृणाल जाधव यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. तहसील कार्यालयातील सर्व मंडळ अधिकारी,सर्व तलाठी, कोतवाल, अवल कारकून, लिपिक, शिपाई हे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळ असणारे तहसील कार्यालय धाराशिव असून सातत्याने स्वच्छता राखणे आव्हानात्मक आहे तरीसुद्धा स्वच्छ कार्यालय सुंदर कार्यालय असा मानस बाळगून आम्ही हा उपक्रम सकारात्मकपणे टप्प्याटप्प्याने राबविणार आहोत अशी माहिती जाधव यांनी दिली.
सध्या महसूल विभाग हा महसूल पंधरवडा साजरा करत आहे या अनुषंगाने तहसील कार्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला असुन वातावरण प्रसन्न झाले आहे.नागरिकांनी सुद्धा कार्यालयात आल्यावर स्वच्छता राखवी, खराब, न लागणारी कागदपत्रे कुठेही टाकू नये शिवाय धूम्रपान, भिंती व कोपऱ्यात थुंकू नये.