धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेची निवडणुक रंगात आली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपुर्वी मंत्री तानाजी सावंत व शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे कार्टून व्हायरल झाले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी एक कार्टून पोस्ट केले आहे. त्यात मंत्री सावंत असे सांगत आहेत की, अरे बाळा तुला आमच्या शब्दावर निवडून दिले आहे. पैसे खाऊ नकोस त्यावर ओमराजे हे पैसे नाही तर शेण खाऊ का ? असे उत्तर देताना कार्टूनमध्ये दाखवले आहे.
ढोकी येथील शिवसेना मेळाव्यात मंत्री सावंत म्हणाले होते की, निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता काळात भ्रष्टाचार करू नका, असे सांगत होतो. मात्र सत्ता असताना पैसे खायचे नाही. तर मग काय शेण खायचे ? अशा शब्दात हे सांगत होते. यातील एक शब्दही खोटा नाही. खोटे बोलण्याची आपल्याला गरजही नाही, अधिकाऱ्याकडुन पैसे उकळणारांना आता शिवसैनिक योग्य ती जागा दाखवतील असा इशारा दिला होता त्या सभेनंतर त्याचं आशयाचे कार्टून पोस्ट केले आहे.