धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कार्टूनच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेरणा कारखान्यातील भंगार चोर म्हणत सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजेंना टीकेचे लक्ष केले आहे. साखरेने भरलेल्या पोत्यासहित सभासदांनी दिलेल्या तेरणा कारखान्याची वाट लावली, चालू मशनरी भंगारमध्ये विकल्या असे कार्टून पोस्ट केले आहे. बोबराजे अशी उपमा देत तेच ते अन तेच ते असे म्हणत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भंगारचोर अशी टीका केली आहे.
यापुर्वी अरे बाळा तुला आमच्या शब्दावर निवडून दिले आहे. पैसे खाऊ नकोस – पैसे नाही तर शेण खाऊ का ? अश्या स्वरूपाचे कार्टून पोस्ट केले होते.
ढोकी येथील शिवसेना मेळाव्यात मंत्री सावंत म्हणाले होते की, निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता काळात भ्रष्टाचार करू नका, असे सांगत होतो. मात्र सत्ता असताना पैसे खायचे नाही. तर मग काय शेण खायचे ? अशा शब्दात हे सांगत होते. यातील एक शब्दही खोटा नाही. खोटे बोलण्याची आपल्याला गरजही नाही, अधिकाऱ्याकडुन पैसे उकळणारांना आता शिवसैनिक योग्य ती जागा दाखवतील असा इशारा दिला होता त्या सभेनंतर त्या आशयाचे कार्टून पोस्ट केले होते.