अंतरवली सराटी – समय सारथी
रविवारी दिवसभर व रात्री, पहाटे मतदार संघ निहाय सविस्तर चर्चा झाली, आमच्या मित्र पक्षाची यादी रात्री 3 वाजेपर्यंत आली नाही. यादीच नाही म्हणल्यावर लढायचं का हा प्रश्न समोर आला. एकाच जातीवर निवडुन यायचे कसे शक्य आहे, जातीचा अपमान होईल. त्यामुळे मराठा समाज उमेदवार देऊन निवडणुक लढविणार नाही. एका जातीवर कोणीच राज्यात निवडणुक जिंकू शकत नाही. राजकारण आपला धंदा नाही, आपली फसगत होईल त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्या. निवडणूक संपली की पुन्हा आंदोलन करू अशी भुमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.
मुस्लिम दलित मराठा सगळे एक व सोबत आहेत आपल्याला राजकारणात पडायचे नाही. माझी इच्छा नाही की याला पाड त्याला पाड, कोणीही आपले नाही, दोन्ही शहाणे नाहीत. लोकांना काय करायचे ते करा असे ते म्हणाले. एका जातीवर धाडस करणे शक्य नाही, आमचे वाटोळे व्हाययचे. जो आपल्या मागण्याच्या बाजुने राहील, बॉण्ड देईल त्याला मदत करा, मराठा समाजाला विश्वासात घेतले नाही तर त्याला पाडा असे आवाहन केले.