धाराशिव – समय सारथी
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन यात जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा सरचिटणीस,जिल्हा चिटणीस, तालुका अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी तथा मीडिया विभाग प्रमुख अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.जुना नवीन गट, चेहेरे असा सुवर्णमध्य साधला गेल्याचे दिसले. काही जणांना बढती तर काही जणांना आहे तीच जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रम देशमुख, रामहरी शिंदे, अभय चालुक्य, विकास बारकूल, डॉ सरोजिनी राऊत, सुनील काकडे, दत्ता देवळकर, बालाजी गावडे, सुरेश कवडे, आदेश कोळी, सुदाम पाटील, सुखदेव टोम्पे, माधव पवार, मिनाज शेख, कैलास शिंदे, डॉ गोविंद कोकाटे, महादेव आखाडे यांचा समावेश आहे.
जिल्हा सरचिटणीसपदी विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे, दीपक आलुरे, इंद्रजीत देवकते व माधुरी गरड यांचा समावेश आहे.
जिल्हा चिटणीसपदी साहेबराव घुगे, राजकुमार पाटील, सिद्धेश्वर कोरे, अंगद मुरूमकर, सचिन इंगोले, युवराज जाधव, वनिता कटाळे, पल्लवी रोचकरी, राणी राठोड, वैभव मुंडे, सुजित परदेशी यांचा समावेश आहे.
जिल्हा कोषध्यक्षपदी नेताजी शिंदे, समन्व्यक शिवाजी गिड्डे पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष नंदा पनगुडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर तर जिल्हा प्रसिद्धी तथा मीडिया विभाग प्रमुख धनंजय रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष उमरगा शहाजी पाटील, तुळजापूर संतोष बोबडे, कळंब अजित पिंगळे, लोहारा शिवशंकर हत्तरगे, भुम महादेव वडेकर, धाराशिव ग्रामीण राजाभाऊ पाटील, परंडा ऍड गणेश खरसडे, वाशी राजगुरू कुकडे व धाराशिव शहर अध्यक्षपदी अभय इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीस जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील,आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, प्रदेश विशेष निमंत्रीत सदस्य विनोद गपाट, प्रवीण पाठक, गुलचंद व्यवहारे, सतीश देशमुख, जिल्हा प्रभारी डॉ अजित गोपछडे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.