धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर व विजय राठोड वादाला राजकीय रंग देणे म्हणजे खोडसाळपणा असुन भाजपला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
विजय राठोड हे पूर्वी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख होते, म्हणजेच उबाठा पक्षाचे कार्यकर्ते होते. त्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता.काल झालेला वाद कशामुळे झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र त्यापूर्वीच याला राजकीय रंग देत भाजपला बदनाम करण्याचा घाट कांहीनी घातला आहे.
आमच्या नेत्यांसोबत जसे राठोड यांचे बॅनरवर फोटो आहेत, तसेच उबाठा पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्या सोबतचे फोटो देखील त्यांच्या बॅनरवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय भांडणाचे स्वरूप देणे हा स्पष्ट खोडसाळपणा असून भाजपची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणाशी भाजपचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते दुरान्वयेही संबंधित नाहीत.मात्र निवडणुक जवळ आली असल्याने विरोधक खोडसाळपणे याला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे.












