भुम – समय सारथी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असुन भुम परंडा वाशी येथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांच्यात लढत होत आहे, त्यात वंचितकडुन प्रवीण रणबागुल व रासपकडुन डॉ राहुल घुले हे रिंगणात आहेत. मंत्री सावंत हे दुसऱ्यांदा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत तर मोटे हे पाचव्यादा निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. इथे धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशी लढत आहे.
परंडा विधानसभा मतदार संघात शहरी भागात 51, ग्रामीण भागात 325 असे 376 मतदान केंद्र असुन 14 टेबलवर मतमोजणीचे 27 राऊंड होतील तर पोस्टल मतमोजणीचे 4 राऊंड होतील. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा येथून विद्यमान पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे सर्वाधिक 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांना सर्वाधिक 1 लाख 6 हजार 674 इतकी मते पडली होती. 2024 विधानसभा निवडणुकीत 1 लाख 94 हजार 896 इतके मतदान झाले आहे.
परंडा विधानसभा मतदार संघात 3 लाख 30 हजार 773 मतदारापैकी 2 लाख 30 हजार 975 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 1 लाख 06 हजार 753 महिला तर 1 लाख 24 हजार 217 पुरुषांनी मतदान केले, महिलांची टक्केवारी 68.63 तर पुरुषांचे 70.89 टक्के मतदान झाले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद कळंब व भुम परंडा विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 523 मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे, त्याची मतमोजणी सुरु आहे.