वसंतदादा दूध संघ रडारवर, तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दाखल – घोटाळ्याचा आकडा वाढला
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील वसंतदादा नागरी बँक व अरविंद पतसंस्था घोटाळ्यात ठेवीदार यांच्या फसवणूकीचा आकडा व व्याप्ती वाढली असुन तपास अधिकारी यांचा लेखी अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. वसंतदादा नागरी बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक व अरविंद पथसंस्थेचे चेअरमन रोहित दंडनाईक यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून विजय दंडनाईक हे फरार असुन रोहित यांनी गुन्हा नोंद असलेल्या 10 लाख पैकी 50 टक्के रक्कम कोर्टात भरली आहे. गेली काही दिवसापासुन कोर्टात तारीख पे तारीख सुरु आहे.
अरविंद पतसंस्थेचा फसवणूकची आकडा 3 कोटी 55 लाखाच्या पुढे गेला असुन त्याबाबतचा लेखी अहवाल तपास अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी कोर्टात सादर केला आहे. सहकार विभागाने अनेक वेळा पत्र पाठवुनही पतसंस्था बंद असणे यासह कुटुंबातील काही संस्थांना क्रेडिट दिल्याचे त्यात म्हणटले आहे. वसंतदादा दूध संघाला लाखोंच्या रकमा नियमबाह्य रित्या दिल्याची माहिती समोर आल्याने तोही रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यात 28 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तर अरविंद पतसंस्था घोटाळ्यात 1 सप्टेंबर रोजी गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
वसंतदादा बँकेने ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
अरविंद पतसंस्थाने तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409, 120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास उपविभागीय अधिकारी राठोड करीत आहेत.