धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात धाराशिव येथील कोर्टाने एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे, या गुन्ह्यातील हा पहिला जामीन असुन जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जामीन मंजुर केला. अलोक काकासाहेब शिंदे या आरोपीला कोर्टाने अटकपुर्व जामीन मंजुर केला असुन आरोपीच्या वतीने ऍड विशाल साखरे यांनी कोर्टात बाजु मांडली. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने जामीन मंजुर केला. अलोक शिंदे हा सेवन गटातील आरोपी होता.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी असुन त्यातील 20 आरोपी अटकेत आहेत तर 16 आरोपी फरार आहेत. 37 पैकी 27 जणांना तस्कर गटात तर 10 जणांना सेवन गटात दोषारोपपत्र वेळी आरोपी केले होते. अलोक शिंदे हा सेवन गटातील कलम 27 अंतर्गत आरोपी आहे.
फरार आरोपी (16) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 16 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सेवन गट (10 आरोपी) – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी उपसभापती शरद रामकृष्ण जमदाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत.