धाराशिव – समय सारथी
साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अभिषेक कदमचा जामीन रद्द केला आहे. जामीन दिल्यानंतर आरोपीने मयत साक्षी हिची आई फिर्यादी, साक्षीदार यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात दबाव आणत होता शिवाय कोर्टात साक्ष देऊ नये म्हणुन साक्षीदाराला धमक्या दिल्या. धाराशीव येथे कोर्टात सुनावणीला आल्यावर दबाव टाकणे, असे प्रकार होत होते. त्यामुळे कोर्टात जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी दिला. या सर्व बाबी कोर्टात मांडल्यानंतर जामीनातील अटींचे उल्लंघन केल्याने कोर्टाने जामीन रद्द केला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात लक्ष घालत आवाज उठवल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला गती आली शिवाय आरोपी हा दबाव टाकत असल्याने जामीन देखील रद्द झाला. जामीन रद्द केल्याने पोलीस हे आरोपीला अटक करू शकतात. आरोपी हा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत असल्याने अटक कधी करतात याकडे लक्ष लागले आहे.
साक्षी संतोष कांबळे ही 20 वर्षाची तरुणी केएसके कॉलेज बीड येथे शिक्षण घेत होती व त्याच महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेला अभिषेक कदम याचेसोबत तिचे प्रेम संबध होते. याबाबत साक्षी हिच्या घरी समजले त्यानंतर त्यांनी साक्षी हिच्या मर्जीने 18 ऑक्टोबर 24 रोजी तिचे लग्न धिरज शरद भंडारे रा पुणे यांच्या सोबत जमवुन साखपुडा केला होता. तिचे लग्न दिनांक 20 एप्रिल 25 रोजी होणार होते. तिच्या लग्नाबाबत अभिषेक कदम व त्याची बहीण शितल कदम यांना समजल्या नंतर ते वारंवार साक्षीला फोन करून मेसेज करून तु दुसरीकडे लग्न कशी करतेस ते आम्ही पाहतो. अभिषेक हा वारंवार त्यांच्या दोघांचे सोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन टाकेन असे म्हणुन धमकी देत होता. त्यामुळे साक्षी मानसिक तनावात होती. साक्षील धाराशिव येथे तीचे मामा मेसा जानराव रा. भिमनगर, धाराशिव येथे राहण्यासाठी घरी पाठविले होते, तिथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिषेक व शितल कदम याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.