धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचा स्तर बिघडला असुन माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते असलेले विजय राठोड यांनी एका दुकानात जाऊन हा हल्ला केला, त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असुन स्थानिक राजकारण, स्पर्धा व आरोप प्रत्यारोपातुन हे घडले असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला आहे. हा ठरवून केलेला नियोजनबद्ध हल्ला व कट असुन यामागे षडयंत्रकारी कोण ? आहे याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. पोलिस तक्रारीत नेमकी बाजु व कारण काय ते समोर येईल.
 
			 
					










