तुळजापूर – समय सारथीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तब्ब्ल 33 वर्षांनी नौकर भरती करण्यात आली, जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचारी यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी तहसीलदार अरविंद बोळगे, माया माने,सिद्धेश्वर इंतूले, जयसिंग पाटील,गणेश मोटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
1991 साली अंदाजे 25 पदांची भरती करण्यात आली होती त्यानंतर सुमारे 33 वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली.सहायक व्यवस्थापक धार्मिक, मंदीर सुरक्षा, जनसंपर्क अधिकारी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर यासह अनेक पदांचा समावेश होता, राज्यभरातील उमेदवार यांचे यापदासाठी नियुक्ती करण्यात आली.
तुळजाभवानी मंदीर संस्थानने 48 पोस्ट सुरुवातीला काढणल्या त्यानंतर काही जागांचा गरजेनुसार समाविष्ट करून 62 पदांना मंजुरी देण्यात आली त्यातील पदे भरण्यात आली. 15 हजारच्या आसपास अर्ज आले त्यातील 9 हजार उमेदवार यांनी परीक्षेत सहभागी झाले. नवरात्र उत्सव संभाजीनगर किंवा पैठण येथे या उमेदवार यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. भक्त व भाविक यांच्याशी सौजन्याने, आदराने वागावे असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी दिला.