धाराशिव – समय सारथी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लाच प्रकरणात पोलिस कोठडी संपल्यावर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र वैद्यकीय तपासणी वेळी त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयव वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले त्यानंतर सोलापूर येथे नेहण्यात आले. मात्र तब्येत ठीक झाल्याने त्यांची धाराशिव येथील जेलमध्ये रवानगी केली. शेळके यांचे निलंबन करण्यात आले आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तात्पुरता जामीन अर्ज नाकारला असुन त्या दोघांचे पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वीरेन्द्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशाने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 95 हजार स्वीकारल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना अटक केली आहे. शेळके लोखंडे या जोडीने एका सहकारी पोलिस महिलेकडुन लाच घेतली हे विशेष. आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं 235/2025 कलम 7, 7 (अ), 12 भ्रष्टाचार अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्यांना 27 जुन 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतानाची कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी केली. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मार्गदर्शन लाभले.