धाराशिव – समय सारथी
घरकुलासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील ग्रामसेवक सुभाष सिद्राम चौगुले यांना धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार यांना शासनाकडून घरकुल मिळणेसाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर येथे पाठवण्यासाठी चौगुले यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष यापूर्वी 2 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून आणखी 3 हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली यावरून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक, सापळा पर्यवेक्षण सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांनी काम पाहिले.सापळा पथकात पोलीस अंमलदार-आशिष पाटील, सिद्धेश्वर तावसकर यांचा समावेश आहे.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.