धाराशिव – समय सारथी
गुन्ह्यात न अडकवण्यासाठी 10 तोळे सोने व लाखो रुपयांची लाच मागून 2 लाख रुपयांची लाच घेताना लोहारा ठाणे प्रभारी यांच्यासह 4 जणांवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे,पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, लोहारा पोलीस ठाणे, पोलिस शिपाई आकाश मधुकर भोसले ,अर्जुन शिवाजी तिघाड़े व ASI निवृत्ति बळीराम बोळके यांना अटक केली आहे.
अँटी करप्शन ब्युरो पुणे यांचेकड़े लेखी तक्रार दिली की, तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलिस स्टेशन जि.धाराशिव येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास सह आरोपी न करणेसाठी यातील लोकसेवक यांनी 5 लाख रुपयाची लाच मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराकडे 5 लाख नसल्याने तक्रारदाराने स्वतःकडील 10 तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले होते ते त्यानी ठेउन घेऊन तक्रारदाराला 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पोलीस ठाण्यातून पाठवून दिले.
तक्रारदार 5 लाख रुपयांची जुळणी करत असताना आरोपी लोकसेवकानी तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्याच्याकडून परस्पर 4 लाख रुपये घेतले परंतु त्यानंतरही आरोपी लोकसेवक तक्रारदाराकडे आणखी 5 लाख रुपयाची लाच मागत असल्याची तक्रार केली होती.
पडताळणी मध्ये पोलिस भोसले व पोलिस बोलके यांनी तक्रारदाराकडे यापुर्वी मागितलेले पैसे आनून देई पर्यंत तक्रारदाराचे 10 तोळ्याचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. लोहारा पोलिस ठाणे प्रभारी API कुकलारे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखाची प्राथमिक मागणी केल्यानंतर पडताळणी कारवाई मध्ये तक्रारदारांच्या भावाकडून 3 लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून की तक्रारदाराकडून आणखी 2 लाख रुपयाची लाच मागणी करून सदर लाच रक्कम पोलिस भोसले किंवा पोलिस तिगाडे यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाणे जि. धाराशिव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी म्हणुन प्रशांत चौगुले, पोलीस उपाधीक्षक, ला प्र वि,सोलापूर,प्रवीण निंबाळकर, पोलीस निरीक्षक, ला प्र वि,पुणे.पर्यवेक्षक अधिकारी दयानंद गावड़े,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वी, पुणे यांनी काम पाहिले.











