राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र धुरगुडे यांची निवड
धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र धुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार विक्रम काळे व प्रा. सुरेश बिराजदार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
धुरगुडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक विषय आक्रमक व अभ्यासपुर्ण मार्गी लावले आहेत. ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.