लहान बालकांत कोरोनाचे प्रमाण वाढले – आज नवीन शंभर रुग्ण
आज 2 रुग्णांचा मृत्यू तर पॉझिटिव्हीटी दर 5.70 टक्के
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असुन गेल्या 4 दिवसात आज कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा शंभरी पार झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात 31 रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 1 हजार 752 पैकी 100 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी दर हा 5.70 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात यापूर्वी 50 ते 60 च्या आसपास रुग्ण सापडत होते मात्र आज हा आकडा 100 झाला असल्याने ही बाब चिंतेची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या 100 पैकी 17 रुग्ण हे 18 वर्ष वयोगटाखालील असून ते कोरोना रुग्ण सापडलेल्या कुटुंबातील सदस्य आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 100 रुग्ण सापडले असून त्यात 32बरुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 68 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक 31 रुग्णांचा समावेश आहे तर तुळजापूर 3, उमरगा 8, लोहारा 7, कळंब 13, वाशी 10 , भूम 7 व परंडा तालुक्यातील 21 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने लहान मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तर स्वतंत्र खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने जिल्हा स्तरावर बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार केली आहे. गरोदर महिलांच्या वैद्यकीय व्यवस्था व प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना आजाराबाबत कोणतीही प्राथमिक लक्षणे सापडल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय उपचार घ्यावा तसेच लसीकरण करावे. कोरोना लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टनस ठेवणेसह इतर नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद येथील साईनगर येथील 65 वर्षीय स्त्री व परंडा तालुक्यातील काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आज 59 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 853 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 61 हजार 214 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 95.67 टक्के आहे तर 60 हजार 329 रुग्णांपैकी 1 हजार 414 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.34 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असताना 1 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला तर 314 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असताना व 100 जण पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे मृत्यू झाला.
7 जुलै – 64 रुग्ण
8 जुलै – 62 रुग्ण
9 जुलै – 55 रुग्ण
10 जुलै – 58 रुग्ण
11 जुलै – 33 रुग्ण
12 जुलै – 67 रुग्ण
13 जुलै – 35 रुग्ण
14 जुलै – 61 रुग्ण
15 जुलै – 51 रुग्ण
16 जुलै – 54 रुग्ण
17 जुलै – 62 रुग्ण
18 जुलै – 57 रुग्ण
19 जुलै – 85 रुग्ण
20 जुलै – 45 रुग्ण
21 जुलै – 50 रुग्ण
22 जुलै – 60 रुग्ण
23 जुलै – 72 रुग्ण
24 जुलै – 69 रुग्ण
25 जुलै – 50 रुग्ण
26 जुलै- 83 रुग्ण
27 जुलै – 74 रुग्ण
28 जुलै – 102 रुग्ण
29 जुलै – 70 रुग्ण
30 जुलै – 72 रुग्ण
31 जुलै – 100 रुग्ण