गोंधळ, नागरिकांत संभ्रम – Emergency Aleart मेसेजने मोबाईल हदरले
भूकंप,पुर, युद्धजन्य स्तिथी यासाठी अलर्ट करण्यासाठी नवीन प्रणाली
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरासह भागातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर Emergency Aleart मेसेज येत मोबाईल व्हायब्रेट झाल्याने नागरिकांत गोंधळ उडाला आहे. अचानक आलेल्या या मेसेजने नागरिकांत संभ्रम आहे. मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत हे मेसेज 10 मिनिटांच्या अंतराने आले असुन ते का आले यासाठी एकमेकांशी फोनाफोनी सुरु केली. काही जणांना हा सायबर अटॅक वाटला मात्र तसे काही नाही हे स्पष्ट झाले आहे.
भारत सरकारच्या दुरसंचार विभागाकडुन एक चाचणीचा इशारा अश्या स्वरूपाचा हा मेसेज असुन पुन्हा emergency अलर्ट हवा आहे का ? हा प्रश्न विचारत yes किंवा no दाबा असे मेसेज प्रक्रियेचे स्वरूप आहे.
स्थानिक प्रशासनाला व आपत्ती जोखीम विभाग यांना या मेसेज व कारणाबाबत सुरुवातीला माहिती नव्हती. मात्र बीएसएनएल अधिकारी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असता भूकंप,पुर, हवामान, युद्धजन्य स्तिथी, आणीबाणी यासाठी देशातील सर्व नागरिकांना एकाचवेळी अलर्ट करण्यासाठी नवीन प्रणाली आल्याचे कारण समोर आले आहे.
नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस व इतर वेळी नागरिकांना मेसेज द्वारे सावध करण्यासाठी केलेला हा चाचणी प्रयोग आहे. देशभर राबवील्या जाणाऱ्या या चाचणीचा गाजावाजा केंद्र व राज्य सरकारने केला नाही.
ब्रिटनमध्ये अशी यंत्रणा वापरली जाते हे ही समोर आले आहे.ही अमेरिकेची कार्यप्रणाली असून भारतामध्ये ही फक्त चाचणी स्वरूपात टेस्ट होत आहे यापुढेही आपल्याला अमेरिकन नागरिकाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचे नॅचरल डिझास्टर अलर्ट भेटत जातील .
Nished
OSMANABAD madhe he massage aale