उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. लोकरे यांनी दिलेल्या विनंती अर्जानंतर प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली करण्यात आली आहे. लोकरे यांची सोलापूर येथे सहायक आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे,याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत.
लोकरे यांनी त्यांच्या काळात तुळजापूर नगर परिषद व तुळजापूरकरवासीय साठी विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे, या प्रकरणात लोकरे यांनी दिलेला चौकशी अहवाल महत्वाचा ठरला होता. या अहवालानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने रोचकरी बंधुवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.