उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागात झालेल्या भीषण अपघातात शिवसैनिक बाळासाहेब देशमुख हे जागीच ठार झाले असून या अपघातात शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सहकारी सुरज शिंदे हे जखमी झाले आहेत.
जखमीवर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशमुख यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर मुंडे व इतर जखमी झाले. गाडी चालवत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.हा अपघात रात्री 2 च्या सुमारास घडला आहे.
देशमुख यांच्यावर आज 11.30 ते 12 च्या सुमारास उस्मानाबाद येथील कपीलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.देशमुख यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.