उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा दिवस हा चांगला ठरला असून तब्बल 2 महिन्यांनंतर रुग्ण संख्या 27 इतकी झाली आहे. रविवारी कोरोनाचे 27 नवीन रुग्ण सापडले तर एकही मृत्यू झाला नाही , विशेष म्हणजे तुळजापूर व उमरगा या 2 तालुक्यात एकही नवीन रुग्ण सापडला नाही त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी लहान मुलांसह नागरिकांत सर्दी, ताप व खोकला या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सर्दी, खोकला व ताप ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याने अनेकांची डोकेदुखी व धाकधूक मात्र नक्कीच वाढली आहे.
उस्मानाबाद, भूम व परंडा या 3 तालुक्यात प्रत्येकी 5 रुग्ण तर कळंब व लोहारा तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण आणि वाशी तालुक्यात सर्वाधिक 8 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 1 हजार 521 तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी 27 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी दर हा 1.77 टक्के इतका झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 27 रुग्ण सापडले असून त्यात 9 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 18 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना आजाराबाबत कोणतीही प्राथमिक लक्षणे सापडल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय उपचार घ्यावा तसेच लसीकरण करावे. कोरोना लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टनस ठेवणेसह इतर नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
रविवारी 87 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 631 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 62 हजार 993 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 96.01 टक्के आहे तर 61 हजार 931 रुग्णांपैकी 1 हजार 447 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.33 टक्के कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असताना 1 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला तर 327 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असताना व 101 जण पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे मृत्यू झाला.
7 जुलै – 64 रुग्ण
8 जुलै – 62 रुग्ण
9 जुलै – 55 रुग्ण
10 जुलै – 58 रुग्ण
11 जुलै – 33 रुग्ण
12 जुलै – 67 रुग्ण
13 जुलै – 35 रुग्ण
14 जुलै – 61 रुग्ण
15 जुलै – 51 रुग्ण
16 जुलै – 54 रुग्ण
17 जुलै – 62 रुग्ण
18 जुलै – 57 रुग्ण
19 जुलै – 85 रुग्ण
20 जुलै – 45 रुग्ण
21 जुलै – 50 रुग्ण
22 जुलै – 60 रुग्ण
23 जुलै – 72 रुग्ण
24 जुलै – 69 रुग्ण
25 जुलै – 50 रुग्ण
26 जुलै- 83 रुग्ण
27 जुलै – 74 रुग्ण
28 जुलै – 102 रुग्ण
29 जुलै – 70 रुग्ण
30 जुलै – 72 रुग्ण
31 जुलै – 100 रुग्ण
1 ऑगस्ट – 83 रुग्ण
2 ऑगस्ट – 96 रुग्ण
3 ऑगस्ट – 105 रुग्ण
4 ऑगस्ट – 93 रुग्ण
5 ऑगस्ट – 71 रुग्ण
6 ऑगस्ट – 99 रुग्ण
7 ऑगस्ट – 60 रुग्ण
8 ऑगस्ट – 72 रुग्ण
9 ऑगस्ट – 94 रुग्ण
10 ऑगस्ट – 74 रुग्ण
11 ऑगस्ट – 98 रुग्ण
12 ऑगस्ट – 92 रुग्ण
13 ऑगस्ट – 63 रुग्ण
14 ऑगस्ट – 86 रुग्ण
15 ऑगस्ट – 42 रुग्ण
16 ऑगस्ट – 70 रुग्ण
17 ऑगस्ट – 43 रुग्ण
18 ऑगस्ट – 45 रुग्ण
19 ऑगस्ट – 51 रुग्ण
20 ऑगस्ट – 70 रुग्ण
21 ऑगस्ट – 68 रुग्ण
22 ऑगस्ट – 27 रुग्ण