तुळजापूर येथील आयसीआयसीआय बँकेमध्ये 63 तोळे बनावट सोने तारण ठेवून पैसे उचलून बँकेची 17,70,851 रुपयांची फसवणुक केल्याने आरोपी विरुध्द तुळजापूर पोलीस स्टेशन येथे शाखाधिकारी सुनिल क्षिरसागर यांचे फिर्यादीवरुन 420, 511, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पालवे, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख, तुळजापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे व त्यांचे पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस नाईक यादव, पोलीस कॉन्स्टेबल सावरे,, साळुंके, ससाणे, पवार यांचे पथकाने आरोपी सद्दाम शेख यास मोहोळ येथुन गेल्या मंगळवारी अटक केली. तसेच आरोपीचे इतर साथीदार रशीद अल्लाउद्दीन नदाफ रा. आरबळी तालुका तुळजापूर व कोंडाजी हारुण खुदादे रा. इटकळ तालुका तुळजापूर यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी अब्बास राजु पठाण रा. इटकळ गल्ली, तालुका तुळजापूर यास मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी इटकळ तालुका तुळजापूर येथून अटक करण्यात आली. सदर आरोपीकडून बनावट सोन्यासह 1,35,100 रुपये जप्त करण्यात आले आहे. आरोपी यांनी बँकेत 3,21,516 रुपयांचा भरणा करण्यात आले असून 4,56,616 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.