ड्रग्ज तस्करासाठी ‘कर्दनकाळ’ – ‘पीक विमा’ नंतर ‘ड्रग्ज’ स्पेशालिस्ट आमदार ओळख , अँटी नार्कोटीक्स क्लब
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज बाबतीत काही लोक कांगावा करीत असुन राजकारण करीत आहेत, या विषयात राजकारण नको, ड्रग्ज संपवून विकास कामे करुन जिल्ह्याचा कायापालट करणार आहे. परंडा व कळंब ड्रग्जची माहिती पोलिस अधीक्षकांना दिली होती असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे. मी ठोस माहिती दिली, आरोपीना पकडून दिले त्यामुळे कोणी कांगावा करू नये असा आरोप केला त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता केला आहे. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील एक प्रकारे ‘कर्दनकाळ’ ठरत आहेत. ‘पीक विमा’ स्पेशालिस्ट आमदार नंतर ते ‘ड्रग्ज मुक्ती’ स्पेशालिस्ट आमदार म्हणुन ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांच्या माहितीचा, नेटवर्कचा पोलिसांना मोठा फायदा झाला आहे असे ते सांगत आहेत. परंडा व कळंब येथे धाराशिव पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
ड्रग्जच्या बाबतीत काही लोक कांगावा करीत आहेत, त्यांनी पोलिसांना काहीही मदत केली नाही, उग काही मोघम बोलत आहेत. सरासरी पोलिसांना माहिती असते मात्र ठोस माहिती व कारवाई होत नसल्याने मी पुढाकार घेतला. ठराविक माहिती देऊन त्याच्या मागे लागून प्रक्रिया करुन घेतली हे वास्तव आहे. यात काही लोकांनी पुढाकार घेऊन पोलिस सोबत काम केलेले आहे, त्याच्यामुळे खरं तर हे पकडले गेले. परंडा येथे वेगवेगळ्या पद्धतीने सुरु आहे हे आता लक्षात आले आहे, कळंब येथे सुरु आहे याची माहिती मी तेव्हा पोलिस अधीक्षक यांना दिली होती. यात राजकारण होत आहे हे दुर्दैवी असुन ड्रग्ज हा गंभीर सामाजिक आजार आहे. गल्लीबोळात 10-20 कोटी रुपयांची फॅक्ट्री सापडत आहे. हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा, पक्षातला, विरोधातला असा विचार करुन राजकारण करू नये. जो सहभागी आहे त्याच्यावर कडक कारवाई होणार असुन राज्याचे मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवुन आहेत. उगाच संभ्रम निर्माण केला जात आहे. मागील, पुढील कनेक्शन कुठे आहे हे पाहून पोलिसांनी कारवाई केली आहे.
अंतीम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री यांनी उत्तर देताना त्यांनी चिंता व्यक्त केली असुन शाळा, महाविद्यालय येथे अँटी नार्कोटीक्स क्लब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अजुन शासन निर्णय यायचा आहे त्यापूर्वी तुळजापूर येथे एक बैठक झाली असुन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सुचना केली आहे. ड्रग्ज, मद्य, रॅगिंग, अत्याचार याबाबत तक्रार करता येईल असे ते म्हणाले. जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयात हे क्लब सुरु करण्यात येणार आहेत.
धाराशिव जिल्ह्याचे हीत कशात आहे हे बघणे गरजेचे आहे. तुळजापूरचे नाव काही लोक सारखे घेत गेले, काही आरोप केले, त्याचा काही फायदा झाला का ? परंडा येथे सुरु आहे त्याचं नाव रोज घेतो का ? परंडा येथे काय काय आहे. कळंब येथे काय आहे. ज्यांनी माहिती दिली त्यांच्या बद्दल तुम्हा सर्वांची आदराची, उपकृत भावना असायला हवी, त्यांनी माहिती दिली ही साधी गोष्ट नाही ना? असेही आमदार पाटील म्हणाले.
काही जन मोठं मोठे आंदोलनाचे बोलतात त्यांनी एकतरी माहिती दिली आहे का? त्यांना माहिती नव्हते का? यात मला जायचे नाही, तो माझा स्वभाव नाही. आपल्या जिल्ह्यासाठी जे योग्य आहे वास्तव आहे. तेचं मी करणार आणि ते होताना दिसेल से म्हणाले. 14 आरोपी अटक झाले व जे 22 आरोपी फरार आहेत त्यात सगळ्या पक्षाचे राजकीय नेते आहेत, त्यांचं काय? काही जन सवंग लोकप्रियतेसाठी काही बोलत आहेत, त्याला आपणं जास्त प्राधान्य देऊ नये, आपली जबाबदारी काय? याचे भान ठेवुन सहकार्य करावे असे आवाहन केले. विविध प्रोजेक्ट आणुन आपणं कायापालट करणार आहोत, त्यासाठी सुकानू समिती गठीत केल्या जाणार आहेत त्यात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे ते म्हणाले.